उत्तर कोरियामध्ये पुरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. हा पूर रोखण्यात अपयशी ठरले म्हणून किम जोंग उनने 30 सरकारी अधिकाऱ्यांना फासावर लटकावले आहे. तर आणखी काही अधिकाऱ्यांनाही मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. उत्तर कोरियात पुरामुळे आतापर्यंत एक हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चागांग प्रांतात मुसळधार पाऊस आणि भुस्खलनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
चोसुन टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार पुर रोखण्यात आणि नागरिकांना वाचवण्यात जे अधिकारी अपयशी ठरले त्यांच्यावरिधोत कडक पावलं उचलण्यात आली आहेत. या पुरात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याच भागातील 20 ते 30 अधिकाऱ्यांना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आले आहे.
उत्तर कोरियाची केंद्रीय समाचार संस्थेने दिलेल्या माहितीनुसार जुलै भागात चीनच्या सीमेजवळ असलेल्या चांगांग प्रातांत पूर आला होता. हा पूर रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावण्याचे आदेश किम जोंग उनने दिले होते. सिनुइजूमध्ये सरकारची एक बैठक पार पडली. त्यात आपात्कालीन भागात कामात कसूर केलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
जुलै महिन्यात उत्तर कोरियामध्ये भीषण पूर आला होता. त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो लक बेघर झाले होते.