गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोलमाफ करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक काढत याची घोषणा केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे टोलमाफ करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचे पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक कोकणात जातात. त्यासाठी मुंबई पुण्यातून अनेक भाविक खासगी वाहनांनी आपल्या गावी जातात. त्यामुळे सरकारने या गाड्यांना टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकानुसार 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
टोलमाफीसाठी भाविकांना आपल्या गाड्यांवर ‘”गणेशोस्तव 2024, कोकण दर्शन” असे लिहलेले स्टिकर जवळच्या वाहतूक पोलीस चौकी किंवा आरटीओ कार्यालयातून घ्यावा लागणार आहे. तो स्टिकर त्यांना त्यांच्या गाडीवर चिकटवावा लागणार आहे. त्या स्टिकरवर गाडी चालकाचे लिहावे लागणार.