Photo- आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी केली.

 

शेतकऱ्यांच्या बांधावर जात आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 

मराठवाड्यात कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट होते. परंतु 2 वर्षांपासून घटनाबाह्य असलेले हे निर्दयी सरकार केवळ पंचनामे करत आहेत. आर्थिक मदत मात्र दिली जात नाही. आताही निसर्गाने कोप केल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. हैराण आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायलाच हवी, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले

अंबडगाव (ता. बदनापूर) येथील शेतकरी बांधवांनी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्याजवळ मोकळेपणाने समस्या मांडल्या.

डोळ्यासमोर वाहून गेलेली पिकं आणि शेतात साचलेलं पाणी… आपली व्यथा मांडताना शेतकऱ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अतिवृष्टी व पीक नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पीकांचे तत्काळ पंचनामे करावे. मी जिल्हाधिकाऱ्यांशीही बोलणार आहे, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली.