कल्याण पश्चिमेच्या बेतुरकरपाडा येथील रहिवाशी सुनील शेजवळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र छायाचित्रकार स्वप्नील शेजवळ यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर लाल चौकी येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पत्रकार व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सुनील शेजवळ यांचे दहाव्या दिवसाचे विधी बेतुरकरपाडा येथील निवासस्थानी होणार आहेत.