शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची  तोडफोडप्रकरणी उद्यान पर्यवेक्षक निलंबित

रत्नागिरी शहरात रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्यांची एका व्यक्तीने तोडपह्ड केली. या दुर्दैवी घटनेनंतर रत्नागिरीतील वातावरण तापले होते. नगरपरिषद प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्यान पर्यवेक्षकाला तात्पुरते निलंबित केले आहे. तसेच शिवसृष्टीमध्ये आता एक सुरक्षा रक्षकही नेमण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.