ICC ने 2025 मध्ये होणाऱ्या World Test Chamiponship ची तारीख आणि स्टेडियमचे नाव जाहीर केले आहे. WTC चा फायनल सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्सवर 11 ते 15 जून 2025 रोजी खेळवला जाणार आहे.
आयसीसीचे सीईओ यांनी या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा अंतिम सामना 11 ते 15 जून रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तसेच या सामन्यासाठी 16 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. WTC 2025 Final ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या इतिहासातील तिसरी फायनल असणार आहे. 2021 आणि 2023 साली झालेल्या फायनलमध्ये प्रामुख्याने न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी विजेतेपद पटकावले आहे. दुर्दैवाने दोन्ही वेळा टीम इंडिया फायनलमध्ये पोहेचली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या 2025 च्या फायनलमध्ये कोणते दोन संघ भिडणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र गुणतालिकेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत.