भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं; प्रीती झिंटाने सांगितला IVF उपचारांदरम्यानचा अनुभव

अभिनेत्री प्रीती झिंटा बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रीतीने तिच्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुख खान, सलमान खान, अमिर खान यांसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र आता बऱ्याच दिवसांपासून ती पडद्यापासून दूर आहे. या सगळ्या दरम्यान अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली.

अभिनेत्री प्रीती झिंटा 2021 साली आई दोन मुलांची आई झाली. प्रीतीने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई बनली. सरोगसीची ट्रिटमेंट घेण्यापूर्वी तिने आयव्हीएफ उपचार देखील घेतले होते. ‘इतरांसारखे मी देखील आयुष्यात चांगले वाईट दिवस अनुभवले आहेत. आयुष्यात नेहमी आनंदी राहण्यासाठी धडपड करावी लागते. मुख्यत: जेव्हा आपण खूप कठीण काळातून जात असतो तेव्हा आनंदी राहणे फारच कठीण असते, असे यावेळी प्रीती म्हणाली.

माझ्या IVF उपचारांदरम्यान मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. यावेळी मला सर्व वेळ हसतमुख आणि छान राहणे खूप कठीण होते. कधी-कधी मला भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं. कोणाशी बोलण्याचीही ईच्छा होत नव्हती. अशा अवस्थेत मी अनेक दिवस काढले, असे प्रीती झिंटाने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रीती आणि तिचा पती जीन गुडइनफ यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. सध्या प्रीती तिच्या कुटुंबासह अमेरिकेत राहते.