बुलढाणा – पोळ्याच्या दिवशी बैल धुताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

drowned

पोळ्याच्या दिवशी बैल सजवले जातात तत्पूर्वी त्यांना धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या दोन शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे (32) हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर (27) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना कळताच मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तातडीने प्रशासनाला अलर्ट केले.

हरणखेड तालुका मलकापूर येथे व्याघ्रा नदीवर पूर आल्यामुळे पुरात गावातील शेतकरी गोपाळ वांगेकर व प्रवीण शिवदे हे  बैल धुण्यासाठी गेले असता ते दोघेही या पुरात वाहून गेले. त्यानंतर बुलढाण्याहून रेस्क्यू टीम आल्यावर त्या टीमने शोध घेतल्यानंतर तब्बल तीन तासानंतर त्यांचे मृतदेह सापडले. यावेळी रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले. दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून या दुर्दैवी घटनेबद्दल आमदार राजेश एकडे यांनी शोक संवेदना व्यक्त करीत मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन केले.