सप्टेंबर महिन्यात बँकिंग क्षेत्रातही अनेक बदल झाले असून या महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्टय़ा असणार आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारांचे आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्टय़ांच्या यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात शनिवार आणि रविवार मिळून एकूण 15 दिवस बँका बंद असतील. दरम्यान, ऑनलाईन व्यवहार सुरू असणार आहे.
1 सप्टेंबर, रविवारी देशभरातील बँका बंद, 4 सप्टेंबरला श्रीमंता शंकरदेव तिरुभव तिथीमुळे आसाममधील बँका बंद असतील. 7 सप्टेंबर, गणेश चतुर्थीनिमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड आणि जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानात बँका बंद, 17 सप्टेंबर मिलाद-उन-नबीनिमित्त सिक्कीम, छत्तीगडच्या बँका बंद, 18 सप्टेंबरला पंग लहबसोलनिमित्त सिक्कीमच्या बँका बंद, 20 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद-उल-नबीनिमित्त जम्मू आणि श्रीनगरच्या बँका बंद, 22 सप्टेंबरला रविवारी संपूर्ण देशातील बँका बंद, 21 सप्टेंबरला श्री नारायण गुरू समाधी दिवसानिमित्त केरळमधील बँका बंद, 28 सप्टेंबरला चौथा शनिवारी संपूर्ण देशातील बँका बंद, 29 सप्टेंबरला रविवारी संपूर्ण देशभरातील बँका बंद.