पुराच्या पाण्याने भरलेला पूल पार करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. हा पूल पार करताना हा तरुण वाहून गेला आहे. यवतमाळमधील ही धक्कादायक घटना असून या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
पूरातून पूल पार करणे पडले महागात, यवतमाळमध्ये तरुण गेला वाहून
वाचा सविस्तरhttps://t.co/Oj41eHN3XD pic.twitter.com/vPgdKhj9si— Saamana (@SaamanaOnline) September 1, 2024
दुपारी पुसद येथे दिग्रस मार्गावरील पूस नदीवरील पुलावरून एका युवकाने पुल पार करण्याचे नसते धाडस केले. यात युवक हा पाण्याच्या प्रवाहामुळे पूस नदीच्या पात्रात वाहून गेला. सदर घटनेची चित्रीकरण एका युवकांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केल्यामुळे सदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन हे युवकाच्या शोधकार्यात लागले असल्याचे कळते. अद्याप या युवकाचा पत्ता लागू शकला नाही .