महाराष्ट्रद्रोही मिंधे-भाजप सरकारचा निर्लज्ज भ्रष्टाचार आणि अक्षम्य बेजबाबदारपणामुळे मालवणच्या राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी मुसळधार पावसात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवद्रोही सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भरपावसात या आंदोलनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सरकारच्या बेजबाबदारपणामुळे मालवणच्या राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी मुसळधार पावसात नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केले. मुसळधार पावसात सकाळी 11 वाजता झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, जय भवानी जय शिवाजी, भ्रष्ट सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी सबंध परिसर दुमदुमून गेला.
अंबादास दानवे यांनी सांगितले की, राज्यभरात मालवणच्या राजकोट येथील घटनेविरोधात राज्यभरात जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. या भ्रष्ट व मुजोरी सरकारचा कडेलोट केला पाहिजे, महापुरुषांचा अवमान करणार्या व प्रत्येक कामात प्रचंड भ्रष्टाचार करणार्या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत, असे ते म्हणाले. आंदोलक दहशतवादी आहे काय, असा सवाल करुन दानवे यांनी मुंबईतील आंदोलनाला परवानगी न देणार्या सरकारचा निषेध केला. पाप करायचे, भ्रष्टाचार करायचा व नंतर माफी मागायची हा प्रकार संतापजनक आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचार करणार्या सरकारचा आम्ही निषेध करतो. पुतळ्याच्या उभारणीत झालेला भ्रष्टाचार हा संतापजनक असून सरकारने माफी मागून उपयोग नाही, या भ्रष्ट सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. रोज भ्रष्टाचार करत बसा, खात बसा, आता ही जनता सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. माफी मागितल्याने हा प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात माजी खासदार सुभाष वानखेडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता कोकाटे, भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हा संघटक नेताजी भोसले, एस.टी.कामगार सेनेचे प्रमुख सल्लागार प्रकाश मारावार, युवासेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर, जिल्हा युवाधिकारी गजानन कदम, बालाजी शिंदे, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, राम चव्हाण, तालुकाप्रमुख गणेश शिंदे, शहरप्रमुख गौरव कोडगिरे, अर्जुन ठाकूर, बळवंत तेलंग, नवज्योतसिंघ गाडीवाले, रवी नागरगोजे, सुनील कदम, किशन फटाले, संतोष हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कल्पना डोंगळीकर, धोंडू पाटील आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.