यावर्षी पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडणार असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडला आणि सप्टेंबरमध्येही हवामान खात्याने मुसळणार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
1 Sept,तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Depression) द ओडिशा,उ आंध्र प्रदेश व छत्तीसगढवर.येत्या 24 तासात वायव्य दिशेस सरकण्याची व पुढे तिव्रता कमी होण्याची शक्यता
📢 मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पुढील काही तासात हलक्या-मध्यम सरी व 24 तासात काही ठिकाणी मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता. pic.twitter.com/wX8wzIMVq3— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 1, 2024
सप्टेंबर महिन्यात देशात एकंदर 109 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली. मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पुढील काही तासात हलक्या-मध्यम सरी व 24 तासात काही ठिकाणी मुसळधार-अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.