2 ऑक्टोबर बिष्णोई समाजाचा सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्यात यावी ही बिष्णोई समाजाची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली असून 1 ऐवजी आता हरयाणात 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू-कश्मीर आणि हरियाणाची मतमोजणी एकाच दिवशी 8 ऑक्टोबर रोजी होईल.
गुरू जांभेश्वर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी बिष्णोई समाज एकत्र येतो. गेल्या 300 वर्षांपासून ही परंपरा पाळण्यात येत आहे. यासाठी हरयाणातील बिष्णोई समाजाचे नागरिक त्यांच्या मूळ गावी राजस्थानात जातात. यंदा 2 ऑक्टोबर रोजी गुरू जांभेश्वर यांचे पुण्यस्मरण आहे. त्यासाठी दोन दिवस अगोदरच बिष्णोई समाजाचे नागरिक राजस्थानकडे प्रस्थान करतात. त्यामुळे हे नागरिक मतदान करू शकणार नाहीत. त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावला जाण्याची शक्यता अखिल भारतीय बिष्णोई महासभेने व्यक्त केली होती.