राज्यात 1 ते 8 सप्टेंबर या काळात ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. यंदा या अभियानासाठी केंद्राकडून ‘जन-जन साक्षर’ व राज्य सरकारकडून ‘साक्षरतेकडून समृद्धीकडे’ हो घोषवाक्ये देण्यात आलेली आहेत. 8 सप्टेबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून ‘साक्षरता सप्ताह’ राबविण्यात येत आहे. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम mobile app वर स्व-नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या ‘साक्षरता सप्ताह’ कालावधी मध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने उपक्रम आयोजित करावयाचे आहेत. अशा सूचना शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.