दापोलीत मिंधे गटाला चांगलाच हादरा बसला असून म्हैसोंडे शाखाप्रमुख मनोज शिर्के यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माजी आमदार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या नेर्तृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचारच देश आणि पर्यायाने महाराष्ट्राला तारणारा विचार आहे. हिंदुह्नदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राष्ट्रहिताच्या विचारांची भगवी पताका खांद्यावर घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे त्या मार्गानेच मार्गक्रमण करत आहेत. त्यांचा हा विचार घेऊन त्याच मार्गाने माजी आम. आणि जिल्हाप्रमुख संजय कदम हे शिवसेनेचा विचार हा दापोलीसह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचवण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. संजय कदम यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मनोज शिर्के यांनी मिंधे गटाला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत ओमकार शिर्के, सुरेंद्र शिर्के, दत्ताराम शिर्के, शिरीष शिर्के, अश्विनी शिर्के, सुषमा शिर्के, मनिषा शिर्के, तन्वी शिर्के, निर्मला गुरव, दिव्या गुरव, सुजाता शिर्के, मंदा गायकवाड, रसिका राक्षे, जयश्री शिर्के, रजनी शिर्के, दर्शना शिर्के, सुलभा शिर्के, प्रमिला पवार, सुलोचना खानविलकर आदींसह म्हैसोंडे गावातील अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
माजी जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी ठाणे उप शहर प्रमुख संतोष शिर्के, दापोली तालूका सचिव नरेंद्र करमरकर, वर्षा शिर्के, विभाग प्रमुख तृशांत भाटकर, उपविभाग प्रमुख दिपक गुरव, सतिश खानविलकर, महेश शिर्के, विनोद जोशी सुरेश भोगल, विलास भोगल आदी मान्यवर उपस्थित होते.