बांगलादेशमधील उलथापलाथीनंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी पलायन करत हिंदुस्थानात आश्रय घेतला आहे. बांगलादेशची परिस्थिती गंभीर असून तेथे अल्पसंख्याक हिंदू, जैन आणि ख्रिश्चनांवर हल्ले होत आहे. शेख हसीन अद्याप हिंदुस्थानातच आहेत. हसीना यांचे बांगलादेशला प्रर्त्यापण करण्यात यावे, अशी मागणी बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी केली आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यास हिंदुस्थानशी संबंध सुधारण्यासाठी आमचे प्राधान्य असेल. मात्र, त्यासाठी हसीनना यांचे प्रर्त्यापण होणे गरेजेचे आहे. तसेच हसीना हिंदुस्थानात राहिल्या किंवा हिंदुस्थानानने त्यांचे प्रर्त्यापण केले नाही तर दोन्ही देशातील संबंध बिघडू शकतात, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
आलमगीर यांनी हिंदुस्थानसोबत संबंध दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. आमचा पक्ष मागचे मतभेद विसरुन सहकार्य करण्यास तयार आहे. अल्पसंख्यांकाची सुरक्षा हा बांग्लादेशचा अंतर्गत विषय आहे. तसेच हिंदुंवरील हल्ले होत असल्याचे अयोग्य वृत्त पसरवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यामागे राजकीय हेतू असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. शेख हसीना यांचं प्रर्त्यापण हिंदुस्थानने केले नाही, तर दोन्ही देशातील संबंध बिघू शकतात, अशी धमकीही आलमगीर यांनी दिली आहे. बांदलादेशातील जनतेच्या भावना लक्षात घेत हिंदुस्थानने हसीना यांचे प्रर्त्यापण करणे गरजेचे आहे, असंही आलमगीर यांनी म्हटले आहे. शेख हसीना आणि त्यांचा अवामी लीग या दोघांनी बांगलादेशचे नुकसान केले आहे. त्यामुळे हसीना यांना हिंदुस्थानने समर्थन देऊ नये, त्यांचे प्रर्त्यापण करावे. हिंदुस्थानने हसीना यांचे समर्थन केल्यास त्यांची प्रतिमा आणखी खराब होईल, असेही आलमगीर म्हणाले.