उद्घाटनाआधीच शिवरायांच्या पुतळ्याचा हात निखळला होता? Inside स्टोरीचा व्हिडीओ व्हायरल

मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करत या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र अवघ्या 8 महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला. यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींच्या संतापामुळे मिंधेंची तंतरली असतानाच आता याच पुतळ्याची एक इनसाईड स्टोरीही समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाले त्याच्या 5 दिवस आधी महाराजांच्या पुतळ्याचा डावा हात खुब्यापासून उखडून पडला होता. त्यानंतर महाराजांनी हातात तलवार घेतलेला पुतळा त्या ठिकाणी बसवला गेला. महाराज तलावारीचा वार करतानाचा हा पुतळा आहे. अशा स्थितीत महाराजांचा दुसरा हात खुला असू शकत नाही. तो मुठ बांधलेल्या स्थितीत असायला हवा होता. मात्र या पुतळ्याबाबत प्रचंड निष्काळजीपणा झाला आणि याची सुरुवात पंतप्रधानांनी लोकार्पण करण्याच्या आधीपासून झाली, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’च्या वार्ताहारने दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शुक्रवारी सकाळी ट्विट करत राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकदा नाही तर दोन तुटल्याचा दावा केला आहे. यासोबत त्यांनी ‘एनडीटीव्ही’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आपटे अचानक उपटले कसे? शिवपुतळा दुर्घटनेवरून संजय राऊत यांचा संतप्त सवाल, ठाणे कनेक्शनवर ठेवलं बोट

अक्षम्य गुन्हा! उद्‌घाटनच्या पाच दिवस आधी महाराजांच्या पुतळ्याचा डावा हात खांद्यापासून उखळून पडला होता. याचा अर्थ पुतळा एकदा नव्हे तर दोनदा तुटला आणि पुतळ्याचे काम निकृष्ट झाले आहे हे सत्ताधाऱ्यांना माहिती होते. या चुकीला माफी असूच शकत नाही, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.