लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे वाहून लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान फडणवीस यांनी ज्या दिवशी माझा पक्ष मला सांगेल त्या दिवशी मी दिल्लीला जाणार, असे सांगत फडणवीस यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्याचे संकेत दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चेवर मोठे भाष्य केले. ते म्हणाले, माझ्या पक्षाला मी चांगल्या पद्धतीने जाणतो. माझी महाराष्ट्रात काय गरज आहे हे पक्षाला माहिती आहे. पण ज्या दिवशी माझा पक्ष मला दिल्लीला येण्यासाठी सांगणार त्या दिवशी मी दिल्लीला जाणार. मला पक्षाने जर नागपूरमध्ये जायला सांगितले तर मी नागपूरला जाणार. मी पक्षाचा सैनिक आहे. पण जे काय सुरू आहे त्या फक्त अफवा असल्याचं मी पक्पं सांगू शकतो. तुम्ही त्या चर्चांवर विश्वास ठेवू नका, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.