पुणे-सातारा महामार्ग हा एका अर्थाने जीवनवाहिनीच ! पण खड्ड्यांमुळे या जीवनवाहिनीची चाळण झाली आहे. रोज हजारो वाहने ये-जा होणारा हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. खेड-शिवापूरपासून वर वरवेपर्यंत महामार्गावर पुलाची कामे सुरू आहेत. परिणामी, , तात्पुरत्या सेवारस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. मात्र, हे सेवारस्ते ‘खड्ड्यांत’ गेले आहेत. हे खड्डे चुकविताना बाहनचालकांच्या नाकीनऊ येत असून, ‘वाट दिसू दे गा देवा…’ अशी याचना ते मनोमन करीत आहेत. खड्ड्यांमुळे वारंवार वाहतूककोंडी होत असून, प्रवाशांना तासंतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. (छायाचित्रे चंद्रकांत पालकर)