देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. धक्कादाय म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो च्या माहितीवर आधारित IC3 या संस्थेने स्टुडंट सुसाईड्स हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
2023 मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्यानंतर सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या मध्यप्रदेश आणि तमिळनाडू राज्यात झाल्या आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात एक हजार 834 विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. तर मध्यप्रदेशमध्ये 1308, तमिळनाडूत 1246 विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे देशातील तरुणांची लोकसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या दहा वर्षात 0 ते 24 वयाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने तरुणांची लोकसंख्या 58.2 कोटींवरून 58.1 कोटीवर घसरले आहे. या आत्महत्यांची संख्या 6 हजार 654 पासून 13 हजार 44 पर्यंत वाढली आहे.