छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा शिवसैनिकांकडून निषेध; महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा केला कडेलोट

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खडकवासला येथे महायुती सरकारविरोधात उग्र आंदोलन करण्यात आले. यावेळी सिंहगड किल्ल्यावरून राज्य शासन आणि संबंधित ठेकेदारांचा निषेध करण्यात आला. यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला.

राज्यात सिंधुदुंर्गात एवढी गंभीर दुर्घटना घडूनही या घटनेवर अतिशय बालिश वक्तव्ये राज्य सरकारमधील मंत्री करत आहे. त्याचाही यावेळी निषेध करण्यात आला. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान केल्याप्रकरणी, तसेच छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याप्रकरणी सरकारने निदान माफी मागावी, असे मत युवासेना जिल्हा अधिकारी निवडणुक समन्व्यक सचिन पासलकर यांनी व्यक्त केले. आता या भ्रष्टाचारी सरकारचा जनताच कडेलोट करेल, असा विश्वास जिल्हासंघटक बुवा खाटपे यांनी व्यक्त केला.

येत्या काळात सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले व संदीप मते यांनी दिला. यावेळी शहरसंघटक संतोष गोपाळ,पोपटतात्या चोरगे,नाना मरगळे,दीपक खिरीड,विनायक अप्पा नलावडे,निवृत्ती वाव्हळ,प्रदीप दोडके,आकाश यादव, सागर जावळकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.