देशाच्या दैवताचा अवमान खपवून घेणार नाही, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगे यांचा इशारा

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याचे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्याच्या घटनेने देशात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासह पूर्ण देशाचे दैवत आहे. देशाच्या दैवताचा अवमान खापवून घेणार नाही. सरकारला याचे परिमाम भोगावेच लागलीत, अशा इशारा मराठा आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी थेट महायुती सरकारला दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हा एक अपघात आहे. कदाचित वाईटातून काहीतरी चांगले घडायचे असेल, त्यामुळे हा अपघात घडला असेल, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. त्यांच्या या विधानावरही जरांगे यांनी केसरकर आणि सरकारवर निशाणा साधला. मनोज जरांगे म्हणाले की, ते तर खूप हुशार आहेत. त्यांना काय बोलावे हे कळत नसावे, एका मंत्र्यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे बोलणं म्हणजे अवघड आहे. केसरकर यांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपचे सरकार जाते, असा त्यांचा रोख असावा, असा जबरदस्त टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.

छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला, याची सखोल चौकशी करून दोषींना तुरुंगात टाका. कायद्याची जरब एवढी बसली पाहिजे की, कुठल्याही महापुरुषाचा अवमान करण्यापूर्वी त्याने दहा वेळा विचार केला पहिजे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे फार वेदनादायक आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून तातडीने याची चौकशी करा, अन्यथा याचे सखोल परीणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिला.