दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी बीआरएस नेत्या के. कविता यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तसेच मोबाईलमधला मेसेजेस डिलीट करणे हा काही गुन्हा नाही असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे.
बीआरएस नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या चौकशीवर ताशेरे ओढले असून ईडीला सुनावले आहे. ईडीने कोर्टात म्हटले आहे की कविता यांनी मोबाईलवरून मेसेजेस डिलीट केले, तसेच कविता यांनी आपला मोबाईल फॉरमॅट केल्याचेही ईडीने म्हटले आहे.
कोर्टाने म्हटलं की फोन ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. त्यात इतर गोष्टीही असतात. कुणी आपली माहिती शेअर करतं का? लोक मेसेजेस डिलीट करतात. आपले मेसेज डीलीट करणे हा अनेकांचा स्वभाव आहे, ही सामान्य बाब आहे. पण मोबाईलमध्ये मेसेज डिलीट करणे किंवा फॉरमॅट करणे हे गुन्हा नाही असेही कोर्टाने म्हटले.