नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मालाड येथे घडली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार महिला मालाड येथे राहते. जून महिन्यात घरात कोणीही नसताना तिच्या पतीने त्यांच्याच नऊ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने अनेकदा स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडेच या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. पित्याकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने सोमवारी रात्री उशिरा दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.