Ratnagiri News – नर्सिंगच्या विद्यार्थिनीवरील बलात्कारप्रकरणी SIT स्थापन, पोलीस अधीक्षकांची माहिती

रत्नागिरीतही कोलकाताची पुनरावृत्ती झाली आहे. नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक केली नाही. यामुळे जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी काल आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SITची नेमण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

रत्नागिरी लैंगिक अत्यााचाराचा तपास सुरु आहे. रत्नागिरीतील अत्याचा प्रकरणाच्या तपासासाठी SIT नेमली आहे. त्यामध्ये महिला इन्स्पेक्टर तपास अधिकारी म्हणून काम पाहणार असून दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी मदतीसाठी असणार आहेत. यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी, सायंटिफिक तपास करण्याचा ज्यांना अनुभव आहे अशा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

या गुन्ह्याचा आम्ही सर्व बाजूने तपास करत आहोत. त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत. गुन्ह्याबाबत चौकशीसत्र सुरू आहे. लवकरच याबाबत विस्तृत अपडेट आपल्याला देवू, असे आश्वासनही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिले.