Chandrapur News – घोडाझरी सिंचन प्रकल्पाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील नदी नाले तुंडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे पर्यटक आता मोठ्या संख्येने निसर्गाचे देखणे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी घराबाहेर पडत आहे. प्रामुख्याने घोडाझरी सिंचन प्रकल्पाचे नयनरम्य रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 98% एवढा पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने या प्रकल्पांना भेट देण्यासाठी कुटुंबासमवेत घराबाहेर पडत आहेत. प्रामुख्याने नागभीड तालुक्यातील नयनरम्य परिसरातील घोडाझरी तलाव व सिंचन प्रकल्प पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. डोंगरकड्यांवरील धबधबे आणि धोकादायक पावसाळी डेस्टिनेशन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंद केले आहेत. त्यामुळे घोडाझरी सारख्या सिंचन प्रकल्पाचा सांडवा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. घोडाझरी येथे बोटिंगची सोय उपलब्ध असल्याने बच्चे कंपनीच्या आनंदात भर पडली आहे.