यूपीतून एमडी घेऊन आलेल्याला रंगेहाथ अटक

यूपीहून एक्स्प्रेसने एमडी घेऊन मुंबईत आलेल्या एका तरुणाला रेल्वे गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. त्या तरुणाकडून 70 ग्रॅम वजनाचा व सात लाख किमतीचा एमडी साठा हस्तगत करण्यात आला. यूपीतला एक तरुण एक्स्प्रेसने मुंबईत एमडी घेऊन येणार असून तो बोरिवली स्थानकात उतरणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार सावंत यांनी उपनिरीक्षक बाबा चव्हाण, पठाण तसेच देशमुख, दळवी, जळवी, भामरे, काळे, शेख व पथकाने बोरिवली स्थानकात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रमोहन मिश्रा (30) या तरुणाला उचलले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दोन वेगवेगळ्या पिशवीमध्ये एमडीचा साठा मिळून आला. सात लाख किमतीचा हा एमडी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.