बदलापूरच्या घटनेनंतर राज्याच्या गृह खात्याची झोप उडाली आहे. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आता समाजाचीच मदत घेतली पाहिजे याची जाणीव मिंधे सरकारला झाली आहे. त्यामुळे कम्युनिटी पोलिसिंगला अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी आज मंजूर करण्यात आला.
धार्मिक उत्सव, सण, मिरवणुकांच्या वेळी वाद होऊ नयेत, तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना काळजी घ्यावी लागते. त्यानंतरही काही अनुचित प्रकार घडल्यास प्रकरण चिघळू नये, सामोपचाराने मिटवले जावे यासाठी पोलिसांचा जनतेशी सातत्याने संवाद असणे गरजेचे असते.
मोहल्ला एकता समिती, शांतता समिती, मोहल्ला पंचायत, तंटामुक्त समिती, पोलीस मित्र आणि स्थानिक पातळीवरच्या समित्या या त्यातून निर्माण झाल्या. यालाच कम्युनिटी पोलिसिंग असे म्हटले जाते. परंतु या समित्यांबरोबर पोलिसांचा आता तितकासा संवाद राहिलेला नाही. बदलापूरच्या घटनेनंतरचा तणाव रोखताना गृह विभागाला त्याची जाणीव झाली. त्यामुळेच या कम्युनिटी पोलिसिंगला पुन्हा प्रोत्साहन देण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे.