Mumbai Rain : मुंबईला उद्या ऑरेंज अर्लट, मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत उद्या म्हणजेच शनिवारी 24 ऑगस्टला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबई पालघऱ, ठाणे, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याचे प्रमुख के.एस होसळीकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ”महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील 4, 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता.काही ठिकाणी”, असे होसाळीकर यांनी ट्विट केले आहे.