शाळेतील सफाई-सुरक्षा कर्मचाऱ्यांची नावे फोटोसह दर्शनी फलकावर लावा; शिवसेनेची मागणी

बदलापूर येथे चिमुकलींवर झालेली अत्याचाराची घटना भयंकर असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेता शाळेत काम करणारे सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिपाई यांची नावे फोटोसह शाळेच्या दर्शनी भागात लावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवाय त्यावर ठेकेदाराचे नाव व फोन नंबरही द्या, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

शिवसेना विभाग क्रमांक 10चे विभागप्रमुख महेश सावंत व शाखा क्रमांक 193 चे शाखाप्रमुख संजय भगत यांनी याबाबत यासंदर्भात आज विभागातील प्रभादेवी महानगरपालिका शाळा क्रमांक 2, आदर्श इंग्लिश हायस्कूल या शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापकांना निवेदन दिले. याबाबत शिवसेना शाळा प्रशासनांच्या पाठीशी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. शाळेतील प्रशासनाने दोन दिवसांत वरील कामगारांची संपूर्ण माहिती फलकावर लावली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी विधानसभा उपसंघटक सूर्यकांत बिर्जे, उपविभाग संघटिका रेखा देवकर, शाखा संघटिका कीर्ती मस्के, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तारक राऊळ, ज्येष्ठ शिवसैनिक रवी गजने, अनिल नागवेकर, युवासेनेचे साहिल कदम, तन्मय विलनकर तसेच अक्षय सुर्वे उपस्थित होते.