आता चेहरा पाहून होणार यूपीआय पेमेंट

युपीआयद्वारे डिजिटल पेमेंट वाढत असताना फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी यूपीआय व्यवहार आता पिनऐवजी बायोमेट्रिक पद्धतीने करण्यावर  काम सुरू आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यूपीआयद्वारे होणारे पेमेंट सुरक्षित करण्यासाठी मोठे बदल  करणार आहे. फिंगरप्रिंट किंवा फेस ऑथेंटीकेशनच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. एनपीसीआय, यूपीआयमध्ये बायोमेट्रिक सुविधा सुरू करण्यासाठी अनेक स्टार्टअप कंपन्यांशी चर्चा करत आहे. पह्न फिंगरप्रिंट स्पॅनर आणि फेस रेकग्नेशन फीचरबाबत चर्चा सुरू आहे.