अंडरवेअरमुळे मुलगी प्रेग्नेंट! महिलेने केला विचित्र दावा

एक महिला तिच्या विचित्र आणि हास्यास्पद दाव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या महिलेने काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीसाठी ऑनलाइन शॉपिंग केली होती. यावेळी तिने ऑनलाइन अंडरवेअर खरेदी केले होते. मात्र आश्चर्य म्हणजे ही अंडरवेअर परिधान केल्याने आपली मुलगी प्रेग्नंट राहिली, असा धक्कादायक दावा एका महिलेने केला. पण नंतर या दाव्या मागचे सत्यही समोर आले.

एका महिलेने सर्वात मोठ्या ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या ताओबाओ वरून अंडरवेअरची एक जोडी खरेदी केली होती. या महिलेच्या मुलीने ती परिधान केल्यामुळे ती गरोदर राहीली असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. याबाबत महिलेने ग्राहक सेवा केंद्रात तक्रारही नोंदविली आहे, अशी माहिती ऑडिटी सेंट्रलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तात देण्यात आली आहे.

महिलेने केलेल्या तक्रारीवर शेवटी कंपनीने मौन सोडले आहे. कंपनीत काम करणाऱ्या महिला आणि इतर कर्मचाऱ्यांची नसबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुलीच्या गर्भधारणेचा कंपनीशी काहीही संबंध नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. तसेच ही एक अफवा असून ती पसरवू नये, असे कंपनीने आवाहन केले आहे. कंपनीने अफवा रोखण्यासाठी यासाठी स्वत: याबाबात लोकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. जेणेकरून अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेवर लोक विश्वास ठेवणार नाही. आणि याचा आपल्या कंपनीवर कोणताही परिणाम होणार नाही.

दरम्यान, कपडे बनवणाऱ्या या कंपनीच्या सीईओने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यात तक्रार करणारी महिला ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचे समोर आले. त्यामुळे ही महिला प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे दावे करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.