शिव विधी व न्याय सेना आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत करणार

बदलापूर येथे आंदोलन करणाऱया 300 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अंगीपृत संघटना शिव विधी व न्याय सेना (महाराष्ट्र राज्य) तर्फे सर्व आंदोलनकर्त्यांना मोफत कायदेशीर मदत दिली जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष  अॅड. नितीश सोनवणे यांनी सांगितले आहे. या प्रकरणी आज अधिवक्ता सत्यन पिल्ले व वैभव पाटील यांनी काही आंदोलकांची बाजू मांडली. या आंदोलकांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असून जामीन अर्ज दाखल झाला आहे.