अंबरनाथमध्ये एका मुलाने आपल्याच वडिलांच्या गाडीला जोरदार धडक दिली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. कौंटुबिक वादातून या मुलाने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंबरनाथमध्ये एका मुलाने आपल्याच वडिलांच्या गाडीला जोरदार धडक दिली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. कौंटुबिक वादातून या मुलाने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. pic.twitter.com/Z5QGbzTcF5
— Saamana (@SaamanaOnline) August 21, 2024
मिळालेल्या माहितीनुसार बिंदेश्वर शर्मा हे सैन्यातून निवृत्त अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा सतीश शर्मा याचे लग्न झाले होते. शर्मा मुंबईचे रहिवासी असून सतीश आणि त्याच्या पत्नीचे भांडण सुरू होते. त्यासाठी बिंदेश्वर शर्मा यांनी मुलाला अंबरनाथमध्ये भेटायला बोलावलं. सतीश जेव्हा वडिल बिंदेश्वर यांच्या घरी पोहोचला तेव्हा ते घरी नव्हते. पण अंबरनाथमध्ये सेव्हन लेव्हर हॉटेलजवळ सतीशला वडिल बिंदेश्वर यांची गाडी दिसली. तेव्हा सतीश सफारी गाडीत बसला होता. त्याने या गाडीने आपल्या वडिलांच्या गाडीला आधी मागून धडक दिली. त्यानंतर युटर्न घेतला आणि समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. त्यातबिंदेश्वर शर्मा यांचा ड्रायव्हर आणि एक बाईकचालकाची तब्येत गंभीर आहे.