पुण्यात मिंधे गट अजित पवार गटावर नाराज, महायुतीच्या मेळाव्यावर बहिष्कार

आज पुण्यात महायुतीची बैठक होणार होती, पण मिंधे गटाने यावर बहिष्कार घतला आहे. लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री शब्द हटवल्याने मिंधे गटाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जन सन्मान यात्रा सुरू आहे. आज आंबेगाव तालुक्यात ही यात्रा येणार असून या यात्रेनंतर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील युती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकावे असे आवाहन मिंधे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सचिन बांगर यांनी केले आहे.

जन सन्मान यात्रे दरम्यान आंबेगाव तालुका विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकरी मेळाव्याचे मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे नामांतर करून फक्त माझी लाडकी बहीण योजना असे केले होते. योजनेतला मुख्यमंत्री शब्द काढून टाकल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.