शीव रुग्णालयात एका निवासी महिला डॉक्टरवर दारुड्या रुग्णाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ही महिला डॉक्टर जखमी झाली आहे. कोलकातामध्ये एका निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. ती घटना ताजी असताना मुंबईत महिला डॉक्टरवर हल्ला झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साडे तीनच्या सुमारास एक व्यक्ती जखमी अवस्थेत रुग्णालयात आला. तेव्हा ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरने या रुग्णावर उपचार करत होती. पण हा रुग्ण दारू प्यायला होता. तेव्हा या रुग्णाने आणि त्याच्यासोबत असलेल्या पाच सहा जणांनी या महिलेवर हल्ला केला आणि मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी डॉक्टरला धमकीही दिली.
महिला डॉक्टरने त्यांचा प्रतिकार केला आणि आरडा ओरडही केली. तेव्हा सर्व आरोपी तिथून पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींची शोध सुरू केला आहे.