देशाची प्रगती आवश्यक आहे. पण निसर्गावर घाला घालून देशाची प्रगती होता कामा नये. वायनाड व हिमाचल प्रदेशमध्ये घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन आतापासूनच पर्यावरणाचे रक्षण करा अन्यथा भविष्यात जगणेही कठीण होईल, असा सल्ला न्या. भूषण गवई यांनी दिला आहे.
केरळ येथील एका कार्यक्रमात न्या. गवई यांनी निसर्गाच्या कोपाबाबत चिंता व्यक्त केली. नैतिक मूल्यांच्या सर्व मर्यादांचे मानवाने उल्लंघन केले आहे. मानव हा स्वार्थी आहे. या स्वार्थाचा फटका येणाऱ्या पिढीला बसणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, असेही न्या. गवई यांनी नमूद केले.
शुद्ध हवा, पाणी मिळत नसेल तर उपयोग काय?
तापमान बदलावर मात करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. कारण शुद्ध हवा, पाणी मिळत नसेल तर जीवनाचा उपयोग काय, असे न्या. गवई यांनी सांगितले.