‘नगर जिल्हा सहकारी बँकेबाबत मला आता काळजी वाटायला लागली आहे. आज तिथे कसे आणि कोणते लोक बसलेत, त्यावर भाष्य न केलेलं बरं! तिथे काय शिजतंय ते सगळ्यांना माहीत आहे,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला. नगर जिल्हा सहकारी बँकेविषयी शरद पवार यांनी काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासमोर ही चिंता व्यक्त केली आहे.
जी.एस. महानगर बँक व नगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष कै. उदय शेळके यांच्या नावाने सुरू होणाऱया ‘उदय गुलाबराव शेळके फाऊंडेशन’चे बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्यावेळी नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भवितव्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, सॉलिसिटर कै. गुलाबराव शेळके आणि त्यांचे चिरंजीव कै. उदय शेळके यांनी सहकारात दिलेल्या योगदानाच्या आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला. या दोघांनंतर बँकेची धुरा सांभाळत असलेल्या गीतांजली शेळके यांचे कौतुकही त्यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, खासदार नीलेश लंके, जिल्हा बँक व महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, ‘पद्मश्री’ पोपटराव पवार, माजी आमदार सुधीर तांबे, अरुण कडू-पाटील उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ‘नगर जिल्हा सहकारी बँक राज्यातील दिग्गज बँकांपैकी एक आहे. मात्र, आता या बँकेविषयी मला काळजी वाटतेय. आज तिथे कसे आणि कोणते लोक बसलेत, त्यावर भाष्य न केलेलं बरं! तिथे काय शिजयंत ते सगळ्यांना माहीत आहे,’ असे टोला पवार यांनी लगावला. नगरमध्ये सहकारी कारखान्याचा उगम नगर जिल्हा सहकारी बँक आणि महानगरसारख्या बँकांमुळे झाला. कारखानदारी वाढली. अनेक कारखाने उत्तम सुरू आहेत,’ असे सांगत, ‘बँकेचे काही प्रश्न असतील, तर हक्काने मांडा. त्यावर मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करीन,’ असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
बँकेवर राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ
n नगर जिल्हा सहकारी बँकेवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजप नेते, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री शिवाजी कर्डिले बँकेचे अध्यक्ष आहे. या बँकेत भाजप विरुद्ध विरोधक असा संघर्ष नेहमीच होतो. बँकेतील कामकाजावर काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांची करडी नजर असते. त्यामुळे या बँकेतील राजकारणाचा प्रभाव सहकारी कारखान्यांवरदेखील पडतो. त्यामुळे नगर जिल्हा सहकारी बँकेवर वर्चस्व मिळण्यासाठी सहकारी कारखानदारांमध्ये