माहिती आणि प्रसारण मंत्रायलाने आज (16 ऑगस्ट 2024) नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेमध्ये 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठीत पुरस्कारांमध्ये मल्याळम भाषेतील अट्टम हा चित्रपट सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट ठरला. तसेच कन्नड चित्रपट ‘कांतारा’ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा बहुमान मिळाला.
माहिती आणि प्रसारण मंत्रायलाने यावेळी 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने सेन्सॉर प्रमाणपत्र दिले होते. त्या चित्रपटांना पुरस्कर देण्यात आले. 2022 मध्ये दिग्दर्शक अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या ‘Kantara’ या कन्नड चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. लहाणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा चित्रपट पुन्हापुन्हा पाहिला. त्यामुळेच ‘कांतारा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट असल्याचे घोषित करण्यात आले. तसेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांना जाहीर झाला.
नॉन-फिचर फिल्म विभागात विशाल भारद्वाज यांना त्यांच्या ‘फुरसत’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाच पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे मकबूल, हैदर आणि कमिने सारखे चांगले चित्रपट बनवून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलेले विशाल भारद्वाज यांना 9 व्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – अट्टम (मल्याळम)
दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट – प्रमोद कुमार (फौजा, हरियाणवी चित्रपट)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – कांतारा
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मुल्यांचा प्रसार) – कच्छ एक्सप्रेस
सर्वोत्कृष्ट चित्रपट (अॅनिमेशन व्हिज्युअल) इफेक्ट गेमिंग आणि कॉमिक्स – ब्रम्हास्त्र
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – सूरज बडजात्या (उंची)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भुमिका) – ऋषभ शेट्टी (कांतारा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भुमिका) – नित्या मेनन (तिरुचित्रंबलम)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (सहाय्यक भुमिका) – पवन राज मल्होत्रा (फौजा, हरियाणवी चित्रपट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहाय्यक भुमिका) – नीना गुप्ता (उंची)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – श्रीपथ (मल्लिकापुरम, मल्याळम चित्रपट)
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (मराठी) – वाळवी
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (हिंदी) – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (तेलुगू) – कार्तिकेय 2
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (तमिळ) – पेन्ननियन सेल्वम पार्ट 1
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (टिवा) – सिकाइसल
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (मल्याळम) – सौदी वेलाक्का सीसी. 225/2009
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (कन्नड) – के.होय.एफ.अध्याय 2
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (पंजाबी) – बागी दी धी
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (ओरिया) – दमन
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (बंगाली) – काबेरी अंतरधन
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (आसामी) – इमुथी पुथी