मुंबईत शुक्रवारी (16 ऑगस्ट,2024 ) रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी येणारी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रधर्म रक्षणाची आहे. सगळ्यांनी एकजुटीने सज्ज होऊन, आता महाराष्ट्र द्वेष्ट्यांना हद्दपार केलंच पाहिजे. आता महाराष्ट्रासाठी लढायचं, आपल्या स्वाभिमानासाठी लढायचं! हा निर्धार महाविकास आघाडीतील प्रत्येकाने केला आहे. या मेळाव्यास महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.