बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे कधी तिच्या अभिनयामुळे तर कधी नेपोटीझम या विषयामुळे कायम चर्चेत असते. अलिकडे अभिनेत्री अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात दिसून आली. या लग्न सोहळ्यानंतर पुन्हा एकदा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे आयोजित करण्यात आलेल्या “राजाधिराज द म्यूजिकल नाईट” या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
यावेळी सोहळ्याकरीता अनन्या साध्या पोशाखात दिसली. या सोहळ्यावेळी अनन्याने टील ब्लू रंगाची फ्लोरल साडी नेसली होती. या साडीवरचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अनन्याने नेसलेली साडी सिल्कची असून त्यावर फ्लोरल प्रिंट आहे. तर त्याच प्रिंटचा ब्रालेट ब्लाऊज घातला आहे. यावर तिने मोठ्या आकाराच्या चांदबाली घातल्या आहेत. कमीत कमी अॅक्सेसरीज वापरण्यात आल्या आहेत. या फोटोसोबत “in full bloom” असे कॅप्शन अनन्याने शेअर केले आहे.