बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर नऊ जणांविरुद्ध नरसंहाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. 15 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत हसीना सरकारविरोधात विद्यार्थ्यांच्या जनआंदोलनादरम्यान झालेल्या नरसंहार आणि मानवतेविरुद्धच्या गुह्यांच्या आरोपाखाली कोर्टाने तपास सुरू केला आहे. हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग आणि त्यांच्या संलग्न संघटनांचेही नाव याचिकेत आहे. आंदोलनादरम्यान मारला गेलेला विद्यार्थी आरिफ अहमद सयाम याचे वडील बुलबुल कबीर यांनी ही याचिका दाखल केली होती.