कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक मिळावे यासाठी केलेली याचिका आज क्रीडा लवादाने फेटाळली आहे. एकमेव मध्यस्थ नाबेल बेनेट यांनी स्वाक्षरी केलेल्या लवादाच्या निकालात विनेश फोगाटने दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे, असे म्हटले आहे. यामुळे ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवण्याच्या विनेशच्या आशा मावळल्या आहेत.
फोगाट ही अद्यापही पॅरिसमध्येच आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले असून याबद्दल आणखी कायदेशीर पर्याय शोधण्यात येईल, असे म्हटले आहे.