मंगळवारी घसरण झाल्यानंतर बुधवारी शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 149 अंकांनी वाढून 79,228 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 4.75 अंकांनी वधारून 24,143 अंकांवर बंद झाला. बुधवारी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 444.58 लाख कोटीवर आले. यामुळे गुंतवणूकदारांना 72,000 कोटी रुपयांचा फटका बसला. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 15 शेअर्समध्ये वाढ तर 15 शेअर्समध्ये घसरण झाली.
आज शेअर बाजार बंद
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी आहे. त्यामुळे शेअर बाजार बंद राहणार आहे. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीवर कोणतेही कामकाज होणार नाही. 15 ऑगस्टनंतर 17 ऑगस्टला शनिवार आणि 18 ऑगस्टला रविवार असल्याने या दोन दिवशीही शेअर बाजार बंद राहणार आहे.