महाराष्ट्र अपडेट

ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज

आयडीयूबीएस, भांडुप येथे झालेल्या ‘ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज 2024’च्या क्लस्टर फेरीत कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळ माध्यमिक विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवला आहे. या स्पर्धेचे आयोजन ब्रिलिओ या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस व सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीने केले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेनेही या आयोजनात भाग घेतला होता.

स्टार्टअप इकोसिस्टमलाही चालना मिळणार

अर्थसंकल्प 2024-25 मध्ये सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी एंजल टॅक्स रद्द केल्याने हिंदुस्थानी स्टार्टअप इकोसिस्टमलाही चालना मिळणार आहे, असे मत सेल्सफोर्स इंडियाचे अध्यक्ष-सीईओ अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञान उद्योगाला तसेच कर्मचाऱ्यांना कर व्यवस्था सुलभ करण्यासाठीच्या उपायांचा आणि टीडीएस भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतच्या विलंबाचा फायदा होईल, असे भट्टाचार्य म्हणाल्या.

युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. विभागीय सचिव- पियुशिका मोरे (अमरावती, यवतमाळ), प्रिया महाजन (अकोला, बुलढाणा, वाशिम), अपूर्वा पिट्टलवार (वर्धा, नागपूर), विस्तारक- तेजस्विनी वानखेडे (अकोला लोकसभा), प्रियंका साळगांवकर (उल्हासनगर, कल्याण (पूर्व), डोंबिवली, कल्याण ग्रामीण), श्रद्धा साळगांवकर (बोईसर, नालासोपारा, वसई), श्रद्धा पांचाळ (पालघर, डहाणू), श्रुतिका कदम (रत्नागिरी विधानसभा, राजापूर विधानसभा), विद्या सरमळकर (सिंधुदुर्ग जिल्हा), श्रद्धा घाग (रायगड जिल्हा), अक्षया महाडिक (कोल्हापूर लोकसभा, हातकणंगले लोकसभा), अ‍ॅड. भक्ती दांडेकर (शिर्डी, कोपरगांव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, नेवासा), नेहा लूंड कोकणे पाटील (शेगांव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड), अ‍ॅड. पूजा भोसले (सातारा लोकसभा), अ‍ॅड. उषा पवार (सांगली लोकसभा), मृण्मयी लिमये (बारामती लोकसभा), छाया खांदेशी (शिरूर लोकसभा), स्वाती बोरकर (धाराशीव लोकसभा), अ‍ॅड. नेहा वर्मा (संभाजीनगर लोकसभा), जिल्हा युवती अधिकारी- निनाक्षी शिंदे (सिंधुदुर्ग जिल्हा).