हिंदुस्थानी लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. लवकरच ‘समर 2’ या डिफेन्स प्रणालीची डिसेंबरमध्ये चाचणी करण्यात येणार आहे. 30 किलोमीटरपर्यंत शत्रूचा अचूक वेध घेणारी ही डिफेन्स प्रणाली युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली.
जमिनीवरून हवेत मारा करणारी ही डिफेन्स प्रणाली किंवा हवाई संरक्षण प्रणाली हवाई दलाने दोन कंपन्यांच्या मदतीने विकसित केली आहे. यापूर्वी ‘समर 1’ या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. या डिफेन्स प्रणालीची रेंज 8 किलोमीटर इतकी आहे. रशियाच्या तंत्रज्ञानाच्या धरतीवर ही डिफेन्स प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ‘समर 1’ मध्ये आर-73 क्षेपणास्त्र असून ‘समर 2’ या नव्या डिफेन्स प्रणालीत आर-27 क्षेपणास्त्र आहे.