लैंगिक शोषण प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित गुरु आसाराम बापूला राजस्थान हायकोर्टाने पेरोल मंजूर केली आहे. न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांच्या खंडपीठाने आसारामच्या अंतरिम पेरोलला मंजूरी दिली आहे. गेल्या 11 वर्षांपासून आसाराम बापू राजस्थानमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. शिक्षा ठोठावल्यानंतर पहिल्यांदाच आसाराम बापूला पेरोल मिळाला आहे. उपचारासाठी सात दिवसांची पेरोल मंजूर करण्यात आली आहे. पोलीस संरक्षणात आसारामला उपचारासाठी महाराष्ट्रात आणले जाईल.
तीन दिवसांपूर्वी आसाराम बापूला छातीत दुखत होते. सध्या जोधपूरमधील एम्स रग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी 20 जून रोजी आसारामने आजारपणाचे कारण देत पेरोल मागितला होता. मात्र पेरोल कमिटीने ही पेरोलला नकार दिला होता. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आसाराम 2 सप्टेंबर 2013 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.