एका शिक्षकेवर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर जमावाने शिक्षकाला जबर मारहाण केली. यातच या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरामध्ये ही घटना घडली आहे.
त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यात अभिजीत दे हा 40 वर्षीय शिक्षक खासगी शिकवणी घ्यायचा. तेव्हा दे याने एका लहान मुलीची छेड काढली असा दावा काही लोकांनी केला. आणि दे याला जमावाने जोरदार मारहाण केली. त्यानंतर जमावाने दे ला पोलिसांच्या हवाली केलं.
पोलिसांनी दे विरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली. पण त्याची तब्येत बिघडल्याने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाला. पण घरी त्याची तब्येत बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. जमावाने मारहाण केल्यामुळे अभिजीत दे चा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.