नवी मुंबईत बेकायदेशीरित्या राहत होते पाच बांगलादेशी, खोट्या कागदपत्रांवरून हिंदुस्थानात प्रवेश

नवी मुंबईत पाच बांगलादेशी नागरिक बेकादेशीररित्या राहत होते. पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळताच त्यांनी या भागात छापा मारला. या प्रकरणी पोलिसांनी चार महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काही घुसखोर बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बांगलादेशातून हिंदुस्थानात घुसले होते. या प्रकरणी पोलिसांनी चार महिलांना अटक केली आहे. त्यांचे वय हे 34 ते 35 दरम्यान आहे. चारही महिला या नवी मुंबईत घरकाम करायच्या. तर अटकेत असलेला 38 वर्षीय पुरुष हा पेंटिंगचे काम करायचा. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाचही जणांना अटक केली आहे.