चंद्रपूर बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. बसस्थानकातल्या स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रपूर बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं असून त्यात डास उडत आहे, अनेक ठिकाणी गुटक्याचा मारलेल्या पिचकारी दिसून येत आहेत. परिसरातच खाद्यपदार्थ फेकलेले आहेत, माशांच्या नुसता घमघमाट बस स्थानक परिसरात दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात सध्या डेंग्यूच्या रुग्णांच्या संखेत वाढ होत असताना बस स्थानकावर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रवाशांनाच्या आरोग्य धोक्यात आल आहे. या बस स्थानकावर हजारो प्रवाशी दररोज प्रवास करीत असतात. मागील 5 वर्षा पासुन चंद्रपूर बस स्थानकाचे काम सुरु असून अजूनही पूर्ण न झाल्याने प्रवाशानं मध्ये नाराजी व्यक्त होत आहे